मराठी

अप्पर वर्धा धरणाचे 1 गेट उघडले : विसर्ग 8 घमी प्रतिसेकंद तर येवा 239 घनमीटर प्रतिसेकंद

प्रतिनिधी/दि.13

मोर्शी – मोर्शी पासून जवळच असलेल्या व अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणा-या अप्पर वर्धा धरणाच्या क्षेत्रांमध्ये मुबलक पाऊस झाल्याने आज दुपारी तीन वाजता रेशमा देशमुख अधीक्षक अभियंता अमरावती प्रवीण सोळंके कार्यकारी अभियंता अमरावती पी.पी. पोटफोडे माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण उपविभागीय अभियंता मोर्शी गजानन साने कनिष्ठ अभियंता व अप्पर वर्धा देखरेख विभाग मोर्शी यांच्या हस्ते जलपूजन करून या धरणाचे 1 गेट 5 सेंटीमीटर उघडले असून पाण्याचा विसर्ग 8 घनमीटर प्रतिसेकंद सुरू केलेला आहे.
आज दिनांक 13 ऑगस्ट 2020 गुरुवारी ला अप्पर वर्धा धरणा मध्ये 341.95 मिटर पाण्याची पातळी असून आज रोजी 91 टक्के धरण भरले आहे धरणामध्ये पाण्याची आवक 239 घनमीटर प्रतिसेकंद असून विसर्ग आठ घनमीटर प्रतिसेकंद सुरू केला आहे
गेल्या तीन-चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण म्हणजेच नळ दमयंती सागर या धरणक्षेत्रात मुबलक पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पावसाची शक्यता व धरणात असलेले पाणी पाहता वरिष्ठांच्या परवानगीने आज दुपारी या धरणाचा 1 दरवाजा उघडण्यात आलेला आहे.
यावेळी दिलीप उतखेडे कालवा निरीक्षक वासुदेव वाघमारे अनिल भुंबरकर मोहन बादशे सुरेश यावले प्रकाश शिरभाते उमेश शिंदे इत्यादी कर्मचारी जलपूजन च्या वेळेस उपस्थित होते
अप्पर वर्धा धरणाचे दारे उघडण्यासाठी स्वयंचलित यंत्र प्रणाली या ठिकाणी उपलब्ध असून यासाठी मोर्शी आष्टी येथून विद्युत आलेली आहे तसेच जनरेटरची सुद्धा व्यवस्था केली आहे परंतु इलेक्ट्रिक स्वयंचलित यंत्र आज काम करीत नसल्याने प्रशासनाची थोडावेळ तारांबळ उडाली असून नंतर हस्त चलित इसमाने काही तांत्रिक बाबी आपल्या स्क्रू ड्रायव्हर ने सुरळीत करून धरणाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला व हस्तचलित यंत्राने धरणाचे एक दार उघडण्यात आले प्रशासनाने अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असून वर्षभरात स्वयंचलित यंत्राची देखभाल करणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Back to top button