मराठी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
अमरावती/दि.३० – राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 च्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दि. 18 ऑक्टोबर, 2020 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि. अमरावती येथे सादर करावे, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती यांनी केले आहे.