पत्रकार हल्ला कृती समितीच्या अध्यक्षपदी बंटी केजडीवाल यांची नियुक्ती.
परतवाडा येथे पॉवर ऑफ मीडियाची बैठक संपन्न.
अमरावती दि ७ : अचलपुर – परतवाडा येथे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. शासकीय विश्राम भवन परतवाडा या ठिकाणी पार पडलेल्या बैठकीमध्ये सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्कचा वापर करून व सॅनिटीझशन करून ही बैठक घेण्यात आली होती. मुख्यत्वेकरुन अचलपुर – परतवाडा कार्यकारिणी घोषित करणे याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ रंगभूमी कलावंत कैलाशबापू पेंढारकर यांची मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली. तर ज्येष्ठ पत्रकार सतीश अकोलकर यांचीसुद्धा मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अचलपुर परतवाडा तालुकाध्यक्ष पंकज साबू यांची व ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांची अमरावती जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. अचलपुर परतवाडा तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली तर अचलपूर परतवाडा महानगराध्यक्ष म्हणून फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली. महानगर उपाध्यक्ष म्हणून जय कुमार घिया व संजय वडूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना हवेहवेसे वाटणारे रुपेश वाजपेयी यांची सचिव म्हणून तर राजेश डांगे यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. संघटक म्हणून मोईन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. नेहमी पत्रकारांवर होणारे हल्ले व त्यांच्यावर दाखल होणारे गुन्हे या अनुषंगाने पावर ऑफ मीडिया या संघटनेने जर्नलिस्ट अटॅक क्शन कमिटीची स्थापना केलेली आहे. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवीण हरमकर हे काम बघत आहेत. त्या अनुषंगाने अचलपुर परतवाडा तालुक्यात करिता सुप्रसिद्ध उद्योजक व अग्रगणी नेतृत्व बंटी उर्फ अजय केजडीवाल यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही बैठक पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड व विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचे निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला नितीन दुरबुडे, नितेश दुबे, प्रा.निर्मळ, पंकज साबू, किस्मत शहा, फिरोज खान, अजय उर्फ बंटी केजडीवाल, सुनील देशपांडे, ललित कांबळे, जयकुमार घिया, राजेश डांगे, रुपेश वाजपेयी, सूनील रोडे, संदीप ढोले, रिजवान हुसेन, नकुल सोनार, मोईन चव्हाण, अजय काकडे, संजय वडूरकर, सय्यद असलम, एड. प्रशांत घाटे, सतीश अकोलकर व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शर्मा व अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्क आणि सैनीटायझरचा उपयोग करून ही बैठक पार पडली.