मराठी

नियमांना डावलून स्वीय सहाय्यकाची नियुक्ती

त्यांना तत्काळ कार्यमुक्त करा - मनोज गेडाम

  • अन्यथा आंदोलन करणार

यवतमाळ दि १७ – जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्याकडे नियमबाह्य ग्रामसेवक यांची स्वीय सहाय्यकपदी नियक्ती करण्यात आली. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. या मागणीचे निवेदन आज 17 मार्चला गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. हि मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे मनोज गेडाम यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या कारभार सध्या ग्रामसेवक स्वीय सहाय्यक म्हणून हाताळत आहे. नियमानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार अध्यक्षांकडे वरिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गातील अध्यक्षांकडे वरिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गातील कर्मचार्‍यास स्वीय सहाय्यक म्हणून नेमता येते. तर सभापतींकडे कनिष्ठ लिपिकाला स्वीय सहाय्यक ठेवता येते. मा झेडपी पदाधिकार्‍यांनी आपल्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून चक्क ग्रामसेवकांना सेवेत ठेवले आहे. जिल्ह्यात सव्वाबाराशे ग्रामपंचायती असताना ग्रामसेवांना मंजूर पदांची संख्या साडेआठशेच्या घरात आहे. त्यातही 224 ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायला ग्रामसेवक नाहीत. विपरीत स्थितीत झेडपीच्या पदाधिकार्‍यांनी चक्क नियमबाह्यपणे ग्रामसेवकांना पीए म्हणून ठेवले आहे. जीएडीने ग्रामसेवकांना पीए म्हणून ठेवता येत नाही, असे अभिप्राय नोंदविले असताना पंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओंसह खुद्द आयएएस असलेल्या सीईओंनी सुध्दा या नियमांची पायमल्ली केली आहे. पदाधिकारी सांगतील ती कामे नियमबाह्य असली तरी करण्याचा सपाटाच जिल्हा परिषदेत सध्या वाढला आहे.
यवतमाळ जिल्ह्याची शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यात ग्रामपंचायतमार्फत लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. माप्र. जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाही. तर दुसरीकडे अध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांकडे नियमबाह्य ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली तरी या ग्रामसेवकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. जेणेकरुन ग्रामपंचायतींना कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळेल. अशा आशयाचे निवेदन गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिले. व ते मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button