गुन्हेगार असलेल्या मनोज मस्की यांना अटक करा
मुसळखेडा येथील गुलाबराव डोंगरे यांची वरिष्ठांकडे मागणी
वरुड/दि. ९ – शेतातील मोसंबीचे झाडे चोरुन नेणारा, घरात घुसून चोरी करणारा तसेच विविध गुन्हे दाखल असून सुध्दा सावंगी येथील मनोज अंबादास मस्की या युवक सद्य: दुसरीकडे नोकरी करण्याच्या उद्देशाने पळुन गेला आहे, त्यामुळे त्याचेविरुध्द गुन्हे असून त्याला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी मुसळखेडा येथील गुलाबराव डोंगरे यांनी केली आहे.
यासंदर्भात गुलाबराव डोंगरे यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, माझे शेत मौजा मुसळखेडा शेत सर्वे नंं.१६५ येथील मी ९ जुलै २०२० ला लावलेली मोसंबी झाडे १५ जुलै २०२० ला रात्री ८ ते ९ च्या दरम्यान चोरीला गेली. यासंदर्भात वरुडपोलिस स्टेशनला गेल्या १६ जुलै २०२० ला तक्र ार दिली असुन त्याच दिवशी पोलिसांनी माझ्या शेतामध्ये पंचनामा केला असता त्यांना चोरी निदर्शनास आली परंतु यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अजुन पावेतो झाली नाही.
माझा पक्का संशय मनोज अंबादास मस्की रा.सावंगी यांच्यावर आहे. याचे अगोदर सुद्धा माझे घरी लग्नकार्य प्रसंगी आम्ही नागपुरला गेलो असता तेव्हा मनोज यानेच १५ मे २०१७ ला कपाट फोडुन ३५ ते ४० हजाराचे सोने चोरुन नेले होते. याची सुद्धा तक्रार पोलिस स्टेशनला दिली होती. त्यानंतर ९ जुन २०१७ ला पाण्याची टाक ी बनविण्यावरुन फार मोठा वाद या व्यक्तीने माझ्याशी केला. त्याने अतिशय अश्लिल शिविगाळ करुन जातीवादक शब्दाचा प्रयोग करुन मला धमकावले की, हातपाय तोडुन विहीरीत टाकतो अशा प्रकारची तक्रार सुध्दा पोलिस स्टेशनला दिली आहे, हे सर्व कारनामे मनोज अंबादास मस्की यानेच केले आहे. हा अतिशय नालायक मुलगा असुन असेच कांड करुन नाशिकला पळुन जातो. या इसमाची आपल्या स्तरावर चौकशी करुन त्याला शिक्षा करुन मला न्याय मिळवुन देवुन माझ्या परिवाराला त्याच्या दहशतीपासुन मुक्त करावे, अशी मागणीही गुलाबराव डोंगरे यांनी केली आहे. दि. ९