मराठी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

पुणे /दी.०६- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन झाले आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले आहे.वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे यकृताच्या कर्करोगाने निधन झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजता गोडसे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यकृताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केेले होते. आज सायंकाळी गोडसे यांचे निधन झाले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी ससून सर्वोपचार रुग्णालायबरोबर एकत्रित काम करून दुर्धर आजारांसह महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. गरिब व गरजू रुग्णांना मोफत व कमी दरात उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले.

Related Articles

Back to top button