मराठी

पाकिस्तान भारताच्या दहशतीखाली

इस्लामाबाद दि १०- दोन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पाकिस्तानी माध्यमांकडून भारत सतत मोठा हल्ला करणार असल्याच्या बातम्या सातत्याने सुरू आहेत. यामुळे पाकिस्तानी सैन्य उच्च सतर्कतेवर आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून युद्धबंदीचे अनेकदा उल्लंघन झाले आहे. बुधवारी भारतीय सैन्याच्या कारवाईत दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
द न्यूजच्या वृत्तानुसार भारतीय सैन्य पाकिस्तानविरूद्ध कोणत्याही वेळी मोठी कारवाई करू शकते. उच्चपदस्थ अधिकारी आणि पाकिस्तानी लष्कराच्या सूत्रांचा हवाला देऊन वेबसाइटने ही माहिती दिली आहे. या अहवालात म्हटले आहे, की,पाकिस्तानी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे, की भारत नियंत्रण रेषेवर किंवा ती ओलांडून लष्करी कारवाई करू शकते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारत कोणत्याही वेळी सर्जिकल स्ट्राइकसारखी करण्यास सज्ज आहे. २०१५- 2016 मध्ये भारताने नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा केला होता. तथापि, याबाबत कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये हाच दावा करण्यात आला होता. भारत युद्धबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही पाकिस्तानकडून केला जात असून पाकिस्तानकडून यास प्रतिसाद दिला जात आहे.
इम्रान खान सरकारमधील मंत्री फिरदौस अवान यांनी नुकतेच सांगितले, की रविवारी विरोधी पक्षांची लाहोरमध्ये मोठी सभा घेणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्व विरोधी खासदार आणि आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत इम्रान सरकारवर प्रचंड दबाव आहे. इम्रान सरकारला वाचवण्यासाठी सैन्य भारताच्या हल्ल्याची भीती पसरवत आहे.

Related Articles

Back to top button