मराठी

दहा लाख नोक-यांचे आश्वासन

राष्ट्रीय जनता दलाचा जाहीरनामा

पाटणा/दि.२४  – राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात रोजगार, शेती, उद्योग, उच्च शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि स्मार्ट व्हिलेज यावर जोर देण्यात आला आहे. बचतगट, पंचायती राज, आरोग्य सेवा, क्रीडा धोरण यासह १७ मुद्द्यांना पक्षाने प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले, की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत दहा लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोक-या मिळतील. सरकारच्या स्थापनेनंतर शेतक-यांची सर्व कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त रोजगार व स्वयंरोजगारात कार्यरत शिक्षकांना व सर्व कंत्राटी कर्मचा-यांना वेतनश्रेणी निश्चित करण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केले आहे. सर्व कामांमधील समान कामाच्या बदल्यात समान वेतन आणि खासगीकरण रद्द करण्याचे जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय जनता दलाने यापूर्वीच्या रिक्त पदांवर नेमणुका करण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन पदेही तयार केली जातील. कंत्राट रद्द करून सर्व कर्मचा-यांना कायमस्वरूपी काम आणि समान वेतन दिले जाईल. सर्व विभागात खासगीकरण रद्द केले जाईल. उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी, नवीन औद्योगिक धोरणांतर्गत एक प्रभावी कर विभेद आणि कर माफ योजना लागू केली जाईल. राष्ट्रीय जनता दलाने शेतीला सिंचन पाणीप्रणालीचा मुद्दा समाविष्ट केला आहे. सर्व सिंचन पंप सौर पंपमध्ये बदलण्याचे आश्वासन दिले आहे. शेतक-यांचे सर्व कर्ज माफ केले जाईल. याशिवाय बिहारमध्ये मोठे क्रीडा विद्यापीठ स्थापनेबरोबरच प्रत्येक विभागात मोठ्या स्टेडियमची स्थापनादेखील अजेंडामध्ये समाविष्ट केली गेली आहे. वृद्धावस्था पेन्शनमध्ये जुनी व्यवस्था लागू करण्याविषयी बोलले आहे. त्याशिवाय गाव स्मार्ट बनविण्यावर भर देण्यात आला आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

  • कार्यकारी सहाय्यक, ग्रंथालय आणि उर्दू शिक्षकांची पुन्हा नियुक्ती
  • स्पर्धात्मक परीक्षांसाठी अर्ज करण्याचे शुल्क काढून टाकणार
  • तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी बिहार युवा कमिशनची स्थापना
  • स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यात विनामूल्य प्रशिक्षणाची व्यवस्था *वृद्ध आणि गरीबांना दरमहा मिळणारे पेन्शन चारशे रुपयांवरून एक हजार रुपये
  • स्थानिक उमेदवारांना सरकारी नोकरीत ८५ टक्के आरक्षण *प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथालये
  • ३५ वर्षांपर्यंतच्या बेरोजगारांना प्रत्येकी १५०० रुपये बेरोजगार भत्ता
  • विद्यापीठे, विशेषतः सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त शैक्षणिक पदे पुनर्संचयित करणार
  • डॉक्टर, परिचारिका, पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचारी भरती.
  • भागलपूरचा रेशीम उद्योग समूह वाढवणार *मिथिलाच्या मखाना उद्योगास चालना
  • माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य व संगणक प्रशिक्षण
  • अंगणवाडी व आशा दीदी यांचे मानधन दुप्पट

Related Articles

Back to top button