मराठी

वस्तीवर दरड कोसळून १८ जणांचा जागीच मृत्यू

१५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत

मुंबई/दि. ७ – मुसळधार पावसाने एका क्षणात डोळ्यादेखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास ८० हून अधिक मजूर राहात असणाऱ्या ठिकाणी भूस्खलन झाले. या भूस्खलनात ८० हून अधिक मजूर दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातील १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्कालीन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून आतापर्यंत दहा जणांची सुटका करण्यात आली.

Back to top button