विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
लखनऊ/दि.१३ – एका महिलेने पुन्हा मंगळवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने ज्वालाग्रही साहित्य टाकून पेटविले आहे. या महिलेला प्रकृती चिंताजनक स्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे सीएमएस डॉ. एसके नंदा यांच्या म्हणण्यानुसार, महिला नव्वद टक्के भाजले आहे. लखनौच्या हजरतगंज कोतवाली परिसरातील विधानभवनासमोर महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मांतरानंतर अंजली तिवारीने तिचे नाव आयशा ठेवले. तिचा नवरा सौदी अरेबियात नोकरी करतो. छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या अंजलीने वैवाहिक संबंध बिघडू लागल्याने आणि हुंडाबळीच्या छळामुळे अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून पेटवून घेतले. अंजली तिवारी हिचा दोन वर्षांपूर्वी अखिलेश तिवारी याच्याशी विवाह झाला. वादानंतर दोघेही स्वतंत्र राहू लागले. काही दिवसांनंतर अंजलीने महाराजगंजमधील रॉयल हाऊस साडी सेंटरमध्ये काम सुरू केले. या कामाच्या ठिकाणीच वीरबहादूरनगर येथील रहिवासी आशिकशी तिची ओळख झाली. या नंतर दोघांनी लग्न केले. अंजलीने तिचे नाव बदलून आयशा केले. काही दिवसांनी आशिक सौदी अरेबियाला निघून गेला. त्यानंतर तिने आपल्या घरी राहण्याचा हट्ट धरला. ती तिच्या पतीच्या घरासमोर धरणे धरून बसली होती. नंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला पोलिस ठाण्यात नेले; पण प्रकरण मिटू शकले नाही. त्रस्त अंजलीने आत्महत्या करण्याच्या प्रकरणाबद्दल १३ ऑक्टोबरला नोटीस दिली होती. त्याचा शोध घेण्यासाठी महिला तपासी अधिकारी मनीषा qसग यांना लखनऊला पाठविण्यात आले.