तहसिल कार्यालयासमोर पुतळा जाळण्याचा प्रयत्न
भाजपा किसान आघाडी, भाजपा, युवा मोर्चा, महिला आघाडीच्या वतीने
वरुड दी ७ – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कृषी विधेयकाद्वारे शेतक:यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य दिले याच विधेयकाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी पत्र काढून सर्व बाजार समित्यांना करण्यास सांगितले. राज्याच्या सहकार व पणन मंत्री यांना केंद्राच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीवर कोणतेही अधिकार नसतांना त्यांनी तत्परतेने अध्यादेशाचा अंमलबजावणीला स्थगिती दिली. ही स्थगिती शेतक:याकरिता घातक असून न्यायाची अवहेलना करणारी आहे. या स्थगिती आदेशाच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी किसान आघाडी, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीतील नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याला जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाकडून जप्त करण्यात आला.
या स्थगितीच्या परिणाम तत्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये उमटायला लागले. कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी जि.गडचिरोलीच्या सचिवाने दि.३० सप्टेंबरला आदेश काढले. या आदेशानुसार बाजार समिती चामोर्शीच्या कार्यक्षेत्रात शेतमालाची खरेदी- विक्री करणा:या सर्वाकडून बाजार समिती फी (सेस) वसूल करण्यात येईल व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा बाहेर माल वाहतूक करावयाची असेल, त्यांनी बाजार समितीमधून बाजार फी व सुपरव्हीजनचा फीचा भरणा केल्याचा दाखला घेवून मालवाहतूक करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले की, बाजार फी व सुपरव्हिजन फीचा भरणा दाखला घेतल्याशिवाय माल वाहतूक करू द्यायची नाही. बारामती जि.पुणे चे कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अरविंद जगताप यांनी स्पष्ट केले की, या स्थगितीमुळे बाजार समितीच्या आवाराबाहेर होणा:या खरेदीवर बाजार समिती सेस वसूल करणार आहे. अशाच प्रकारे अन्य बाजार समितीतून ही शेतक:यांनी बाजार समितीच्या बाहेर विकलेल्या मालावर सेस वसूल करणे सुरू केले आहे.
शेतक:यांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी शेतक:यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी स्थगिती उठवा आणि कृषी विधेयक लागू करण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व प्रतिकात्मक पुतळा जाळण्याला सुरुवात करताच पोलीस प्रशासनाने जप्त केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल मालपे, मोरेश्वर वानखडे, भाजपा महिला आघाडी प्रदेश सदस्या अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष निलेश फुटाने, शेंदूरजनाघाट नगराध्यक्ष रुपेश मांडवे, भाजपा अनुसूचित भटक्या जाती सेल प्रदेश सदस्य रविराज पुरी, भाजयुमो शहराध्यक्ष नितीन गुर्जर, नगरसेवक देवेंद्र बोडखे, हरीष कानुगो, किशोर भगत, नंदकिशोर आजनकर, नलिनी रक्षे, भाजयुमो उपाध्यक्ष दीपक कोचर, यशपाल राउत, सरचिटणीस रोषण धोंडे, नितीन देवघरे, भाजपा सरचिटणीस सुधीर बेलसरे, भाजपा सरचिटणीस बलदेव वानखडे, चंद्रशेखर भोकरे, शषु उर्फ प्रविण मानकर, निलेश वसुले, भाजयुमो सोशियल मिडिया प्रमुख अपूर्व आंडे, भाजयुमो शें.घाट सोशियल मिडिया प्रमुख कुशल जोगेकर, धर्मेंद्र कोकोडे, विजय यावले, रामा खोडे, गणपती नारनवरे यांच्यासह शेतकरी व भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.