मराठी

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर/दि. १० – मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत घटनापीठाकडे खटला वर्ग केला. या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयापुढे ही घटना घडली. किशोर गिरीधर कदम असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रशासनाला कोणीही पूर्वसूचना न देता ही आत्महत्या केल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. चाकूर तालुक्यातील बोळेगाव येथील या तरुणाने एका बाटलीत विषारी औषध आणले होते. तहसील कार्यालयापुढे येताच त्यांने बाटलीतील विषारी औषध प्राशन केले. याची माहिती तहसील प्रशासनाला काहींनी दिली. विषारी औषध घेतल्यानंतर हा तरुण ‘एक मराठा, लाख मराठा‘, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे‘ अशी घोषणाही देत होता. त्यानंतर त्या युवकाला तहसील कार्यालयातील कर्मचाèयांनी चाकूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान, मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपले आणि मराठा समाजाचे भवितव्य अंधकारमय झाले असल्याची एक चिठ्ठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या तरुणाने खिशात लिहून ठेवली होती.

Back to top button