नारळाच्या कवचापासून बनल्या आकर्षक कलाकृती
अलिबाग/ दि. २३ – नारळाच्या कवचापासून सुंदर कलाकृती बनविता येतात, असे कुणी सांगितले तर त्यावर फारच कमी लोक विश्वास ठेवतील; परंतु विजयनंद शेंबकर यांनी ही कला जोपासली आहे. त्यांच्या कलाकृतीचे आता जगभर कौतुक व्हायला लागले आहे.
शेंबकर यांच्या कलाकृती इतक्या सुंदर आहेत, की त्यावरून नजर हटत नाही. अलिबागमधील त्यांच्या आर्ट गॅलरीला ‘आशीर्वाद कलादालन’ असे नाव आहे. तिथे एकापेक्षा जास्त आर्ट डिझाईन्स सजलेल्या आहेत. 12 वर्षांपूर्वी या कलेबद्दलची त्यांची आवड पाहून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वेड्यात काढलेहोते. कचर्यात पडलेले नारळ ते घरी घेऊन येत. त्यातून ते वेगवेगळ्या कलाकृती घडवित. त्यांच्या कलाकृतींची माहिती अन्यत्र वेगाने पसरायला लागली. त्यानंतर कुटुंबातूनही त्यांचे कौतुक सुरू झाले. त्यांच्या आर्ट गॅलरीत ट्रॅक्टर, कार, ऑटो रिक्षा, दुचाकी, बाईक, गणेश आणि कृष्णांच्या मूर्त्या आहेत. त्या सर्वनारळाच्या कवचापासून बनवलेल्या आहेत. घराच्या सजावटीसाठी दिवे, वॉल-हँग क्रॉफ्टदेखील नारळाच्या कवचापासून बनविले आहे. यासाठी तेखराब झालेले नारळ, साल, पानेआणि देठ वापरतात. त्यांच्या कलाकृती तेविकत नाहीत. कारण त्या त्यांच्यासाठी अमूल्य आहेत. शेंबकर म्हणतात की, ही कला विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शिकविण्यास तेतयार आहेत. विजयनंद दिवसा एका खत कंपनीत काम करतात आणि रात्र स्वत: ला कलेसाठी समर्पित करतात. त्यांनी सुमारे 400 कलाकृती तयार केल्या आहेत.