पुणे/दि.८ – गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्टमध्ये सर्व कंपन्यांच्या कार विक्रीत वाढ झाली आहे. टाळेबंदी उठविल्यानंतर आता अर्थचक्र गती घ्यायला लागले आहे. वाहन क्षेत्रातील ब-याच विभागांनी केवळ जुलैच नव्हे, तर गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापेक्षाही जास्त विक्रीची नोंद केली आहे. कार विक्रीचा विचार केला, तर मारुती आणि ह्युंदाई क्रमांक एक व दोनवर आहेत. दोन्ही कंपन्यांनी जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जास्त कार विकल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑगस्टमध्ये मारुतीच्या विक्रीत २१.३ टक्के, ह्युंदाईच्या विक्रीत २० टक्के, टाटा मोटर्सच्या विक्रीत १५४ टक्के आणि एमजी मोटर्सची विक्री ४१ टक्के वाढली; परंतु टोयोटाच्या विक्रीत ४८ टक्के आणि किआ मोटर्सच्या विक्रीत ७४ टक्के घट झाली. हिरोने गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी ऑगस्टमध्ये ८.५ टक्के अधिक बाईक विकल्या. त्याचप्रमाणे होंडाची विक्री ०.६ टक्के आणि बजाजच्या विक्रीत तीन टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत टीव्हीएस(TVS) आणि रॉयल एनफील्डची(ROYAL ENFIELD) विक्री घटली. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत फारसा बदल झालेला नाही. या वेळी ऑगस्टमध्ये महिंद्राच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत टार टक्के वाढ झाली आहे, तर अशोक लेलँडच्या(ASHOK LEYLAND) विक्रीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. टाटा मोटर्सने(TATA MOTORS) त्याचे आकडे जाहीर केलेले नाहीत.
ट्रॅक्टर विक्रीत वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत मqहद्र आणि मqहद्राने ६९ टक्के अधिक ट्रॅक्टर विकले. सोनालिकाने आणि एस्कॉट्र्सने ८०० टक्के अधिक ट्रॅक्टर विकले.