मराठी

नेहरू युवा केंद्रातर्फे जलसंवर्धनावर जनजागृती

अमरावती, दि. 23 : नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय सेवा योजना व भारती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त जलशक्ती व जलसंवर्धन या विषयावर वेबिनार झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रज्ञा येनकर, पानी फाऊंडेशनचे जीवन गावंडे, जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर आदी उपस्थित होते.  भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी पाण्याची बचत व संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. गावंडे यांनी केले. श्रीमती येनकर, श्रीमती बासुतकर यांचीही यावेळी भाषणे झाली. याच विषयावरील पोस्टर प्रेझेंटशन कार्यक्रमही घेण्यात आला. जलसंवर्धनाबाबत पोस्टरच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. नेहरू युवा केंद्रातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करत असल्याचे श्रीमती बासुतकर यांनी सांगितले. एन. आर. थोरात, गजानन बनसोड, सुनील माकोडे, किशोर राऊळकर, अशर इकबाल आदी प्राध्यापकवृंद उपस्थित होता.

Related Articles

Back to top button