मराठी

बाबासाहेबांनी समतेचा धडा शिकवीला-साखरवाडे

महापरिनिर्वाणदिनी कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली

नांदगांव पेठ दि ६ -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अजरामर असे विचार भारतीयांमध्ये पेरले त्यांच्या विचारांना आत्मसात करणे ही प्रत्येकाची गरज आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा धडा शिकवीला असून आपण या समतेच्या बळावर क्रांती घडवू शकतो असे मत अखिल तेली समाज संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष किशोर साखरवाडे यांनी केले. गडलिंगपुरा येथिल बुद्ध विहारामध्ये आज महापरिनिर्वाणदिनी समाजबांधवांच्या वतीने सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सर्वसमावेशक होते. त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी प्रत्येक समाजातील युवकांनी पुढे येऊन हे कार्य अविरत करणे गरजेचे आहे तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असेही साखरवाडे यावेळी बोलले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे सदस्य मंगेश तायडे व बजरंग दल विभाग संयोजक संतोषसिंह गहरवार व तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश साकोरे उपस्थित होते.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व वंदन करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी श्रीकृष्ण साकोरे, मनोज हटवार, गौरव साखरवाडे, दिलीप नागापुरे, अरुण इंगोले, ज्ञानेश्वर इटनकर, मारोतराव गडलिंग, राजेंद्र कांबळे, मनोज गडलिंग, सचिन कांबळे, राहुल कांबळे, सतीश कांबळे, नितीन गडलिंग, धर्मपाल गडलिंग, हिम्मतराव गडलिंग, मनोहर गडलिंग, सपना गडलिंग, वैशाली गडलिंग, रेणुबाई गडलिंग,नंदा गडलिंग, निकिता गडलिंग यांचेसह अनेक अनुयायी व तेली समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button