मराठी

बांगला देशाचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त

नवीदिल्ली/दि.१४ – बांगला देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) एक लाख ३८ हजार चारशे रुपये असू शकते, भारताचे हेच उत्पादन एक लाख ३७ हजार ५९४ रुपये असू राहील, अला अंदाज जागतिक नाणेनिधीने व्यक्त केले आहे. आता त्यावरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. २०२१ मध्ये भारतातील दरडोई जीडीपी एक लाख ४८ हजार १९० रुपये होईल, तर बांगला देशाचा जीडीपी एक लाख ४५ हजार २७० रुपये होईल. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न एक लाख ३७ हजार २१ रुपये असून बांगला देशात दरडोई जीडीपी एक लाख ३७ हजार ८२४ रुपये आहे. जागतिक नाणेनिधीने म्हटले आहे, की कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी पुढे जाणारा रस्ता खडतर आहे. जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार बांगला देशापेक्षा भारताची अवस्था बिकट आहे. या वर्षी भारताच्या दरडोई जीडीपीमध्ये दहा टक्के घट झाली आहे, तर बांगला देशात दरडोई जीडीपी वाढ चार टक्के आहे. दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) बाबतीत, काही वर्षांपूर्वी भारत बांगला देशाच्या तुलनेत खूपच पुढे होता; परंतु बांगला देशाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बांगला देशाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. जागतिक नाणेनिधीचा याबाबतचा अहवाल पाहिला, तर जीडीपीच्या बाबतीत भारत फक्त पाकिस्तान आणि नेपाळच्या पुढे राहू शकेल. याचाच अर्थ असा की भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अन्य दक्षिण आशियातील देशांच्या पुढे बांगला देश भारताच्या पुढे आहे. यावर्षी नेपाळ आणि भूतानच्या अर्थव्यवस्थेत वाढीची अपेक्षा आहे. भारतीय रिझव्र्ह बँकेने आर्थिक विकासात साडेनऊ टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला असताना जागतिक नाणेनिधीने मात्र २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ९.६ टक्के घट होईल. स्पेन आणि इटलीनंतर जगातील ही तिस-या क्रमांकाची घसरण असल्याचे अहवालात म्हटले आहे. जागतिक नाणेनिधीने अहवालात म्हटले आहे, की विकसनशील देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था यांच्यातील ही सर्वांत मोठी घसरण असेल. चीन व्यतिरिक्त इतर विकसनशील अर्थव्यवस्थांत २०२० मध्ये ५.७ टक्क्यांची तूट राहील.

भारताची अर्थव्यवस्था सर्वांत वाईट

जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर १९९१ च्या तुलनेत सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. श्रीलंकेनंतर भारताची अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील सर्वात वाईट अर्थव्यवस्था असण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधरू शकेल. त्यामुळे दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) पुन्हा एकदा बांगला देशच्या तुलनेत भारत पुढे जाईल.

Related Articles

Back to top button