मराठी

बँका सलग चार दिवस बंद

मुंबई/दि १० मार्चम्हणजेच आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यात लोकांकडे बँकेशी संबंधित बरीच कामे असतात. अशा परिस्थितीत आपलेकोणतेही काम अडकलेअसेल, तर तेलगेच पूर्ण करा. अन्यथा उद्यापासून बँका पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
11 मार्चरोजी बँकेत सुट्टी असेल. यानंतर 13 ते16 मार्चदरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. 13 आणि 14 मार्चला शनिवार व रविवारची दुसरी सुट्टी आहे. यानंतर 15 आणि 16 मार्चरोजी संप पुकारण्यात आला आहे. संप झाल्यास बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. 11 मार्च ते16 मार्चदरम्यान बँका फक्त शुक्रवारी 12 मार्चलाच उघडतील. प्रदीर्घसुट्टीमुळेशुक्रवारी कर्मचार्‍यांची संख्या कमी होऊ शकते. बँकातीव वाढत्या गर्दीचा कमी कर्मचारी कसा सामना करणार, याची चिंता लागली आहे. 11 मार्चरोजी महाशिवरात्रीमुळे बँकांना सुट्टी आहे. रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार 20 राज्यांतील बंद राहतील. 13 मार्चला दुसरा शनिवार असल्यानेबँकांना सुटी आहे. 14 मार्चला रविवार असल्यान बँकांना हक्काची सुट्टी आहे. 15 मार्चरोजी काही बँक संघटनांनी संपाची घोषणा केली आहे. या संपात बँकांच्या नऊ कामगार संघटना सहभागी होत आहेत. संघटनांनी 15 मार्चपासून दोन दिवसाचा संप जाहीर केला आहे. हा संप बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत संप झाल्यास काही राज्यांमध्येबँक सलग चार दिवस कामकाज ठप्प होईल.

Back to top button