अमरावती विभागातील बॅंकांद्वारा लक्ष्यांक ५० टक्केही कर्जवाटप नाही केले गेले
आर्थिक संकटात सापडले आहे शेतकरी
अमरावती/दि-१३– अमरावती विभागातील बँकांद्वारा लक्ष्यांकाच्या 50 टक्केही कर्जवाटप केले गेले नाही आहे. यामध्ये अमरावती जिल्हा सर्वात माघारला आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यात कर्जमाफीचा निधी उपलब्ध झालेला असताना शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया धिमी असल्यामुळे शेतकरी थकबाकीदार राहत आहे. त्यामुळे खरिपाचे कर्जवाटप माघारले आहे.
पश्चिम विभागात यंदा 30 लाख हेक्टरमध्ये खरीप पेरणी झालेली आहे. त्यापूर्वी सोयाबीनचे उगवण नसलेल्या बियाण्यांमुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. कापसाचे चुकारे अद्यापही मिळालेले नाहीत.
आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बँकाच्या चकरा मारत असताना त्यांना खरीप पीककर्ज मिळालेले नाही. नियमित कर्जदारांना प्रोत्साहन लाभ मिळेल, असे शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याने हे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र विभागात दिसून येत आहे. विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकांनी सद्यस्थितीत सर्वाधिक 63.90 टक्के कर्जवाटप केले. यामध्ये बुलडाणा जिल्हा बँकेने लक्ष्यांक पूर्ती केली.
जिल्हा बँकाद्वारा 2 लाख 20 हजार 310 शेतक-यांना 1,406 कोटी 27 लाखांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे वाटप फक्त 33.74 टक्के आहे. या बँकांनी 2 लाख 14 हजार 916 शेतक-यांना 2015 कोटी 75 लाखांचे वाटप केलेले आहे. ग्रामीण बँकांनी आतापर्यंत 41.56 टक्के वाटप केले आहे. या बँकांद्वारा विभागात 39,814 शेतक-यांना 385 कोटी 32 लाखांचे वाटप करण्यात आलेले आहे.