रिज़र्व बँकच्या आदेशाला बँकांच्या वाटाण्याच्या अक्षता
सोन्याच्या किंमतीच्या नव्वद टक्के कर्ज देण्यास नकार
मुंबई/दि.१७ – अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी भारतीय रिज़र्व बँकेचा आणखी एक प्रयत्न अनेक बँका आणि वित्तीय संस्थांना रुचलेला नाही. या संस्था सोन्याच्या किमतीतील चढ-उतारामुळे एकूण किमतीच्या ९० टक्क्यांपर्यंत सुवर्ण कर्ज देण्यास तयार होत नाहीत. काही आर्थिक तज्ज्ञही बाजारातील अस्थिरतेमुळे सुवर्ण कर्ज बुडण्याचीही भीती व्यक्त करत आहेत. भारतात लोकांकडे सोन्याचा आठवा हिस्सा आहे. ते संकटाच्या काळात सोन्याचा वापर करतात. हे लक्षात घेऊन रिझव्र्ह बँकेने नुकतेच सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत कर्जाची मूल्य मर्यादा ७ टक्क्यांवरून वाढवून ९० टक्के केली. बँकेच्या घोषणेनंतर सोन्यात अस्थिरता वाढली आहे. मंगळवारी एकाच दिवसात आंतरराष्ट्रीय मूल्यात ५.७% ची घसरण आली आहे. ही घसरण गेल्या सात वर्षांत सर्वात जास्त होती.
दुसरया दिवशी १.३% ची उसळी घेतली. या अस्थिरतेमुळे बँक सुरक्षेच्या कमी फरकात कर्ज देण्यात तयार होत नाहीत. भारतीयांमध्ये सोन्याची मागणी पाहता केंद्र सरकारने सॉव्हरिन गोल्ड बाँडसारख्या अनेक योजना आणल्या; मात्र भारतीयांनी केवळ २० टन सोनेच घेतले आहे. घरांत २५ हजार टन सोने जमा आहे. अशात सरकार अन्य प्रस्तावांवर विचार करत आहे. रिझव्र्ह बँक आपल्या ६१८ टन भांडार सरकारकडे हस्तांतरित करेल. तसेच बाजार मूल्याच्या ९० टक्क्यांवर फेरखरेदी करेल.