मराठी

परवडणा-या घरांत जागेच्या भावाचा अडथळा

मुंबई/दि.१५ – मुंबईकरांना परवडणारी घरे हवी असतील किंवा परवडणा-या घरांची संख्या वाढवायची असेल तर सरकारने धोरणांचा विचार करून नवीन योजना तयार करावी लागेल. या घरांच्या उपलपब्धतेत जमिमीच्या जागांचा भाव हा मोठा अडथळा आहे, असे स्पष्ट मत नरेडको नॅशनलचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, की मुंबईसारख्या शहरांमध्ये परवडणा-या घरांच्या बांधकामात जागांचे जादा भाव हाच मोठा अडथळा आहे. सरकारला परवडणा-या घरांची संख्या वाढवायची असेल, तर धोरणात्मक विचार करून नवीन योजना तयार कराव्या लागतील. शहराच्या मध्यभागी परवडणारी घरे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; पण या सगळ्यामागील प्रमुख कारण महागड्या जमिनी हेच आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 45 लाखांपर्यंत वाढविण्यात यावी. मुंबईसारख्या शहरात महागड्या जमिनीमुळे इतक्या कमी किंमतीत घरे मिळत नाहीत. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाड्याने परवडणा-या घरांची नवीन संकल्पना नरेडको पुढे आणेल. पुढील केंद्रीय अर्थसंकल्प लक्षात घेता नरेडको यांनी आपल्या मागण्यांसाठी अर्थमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
डॉ. हिरानंदानी पुढे म्हणाले, की मुंबईत सध्या बुलेट ट्रेन वगळता एमएमआरडीए आणि इतर प्रकारच्या प्रकल्पांसह एकूण तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांत अशा विविध प्रकल्पांमध्ये तीन लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत; पण यापूर्वी पाचशे वर्षांत तीस हजार कोटी रुपये खर्च झाले होते.

Related Articles

Back to top button