ग्रामीण भागात लसीकरणात अडथळे
अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – कोरोना परिस्थितीमूळे ग्रामीण भागात लसीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत आहे. त्या परिस्थितीत लसीकरण करावे की नाही असा प्रश्न आरोग्य कर्मचार्यांना पडला आहे. तर लसीकरण करून घ्यावे की नाही असा प्रश्न लाभाथ्र्यांना पडत आहे. त्यामुळे लसीकरणाचे वार्षिक उद्दिष्ट ३० ट्नयाच्या पुढे गेले नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय लसीकरणाची मोहिम सातत्याने घेण्यात येत असते. विशेषत: नवजात शिशुचे लसीकरण करण्यात आरोग्य विभाग नेहमीच अग्रेसर असतो. मात्र कोरोना परिस्थितीने चार महिन्यात लसीकरणात अडथळे निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात १ एप्रिल ते २५ जुलै या चार महिन्यात कोरोनाची रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दच्या लढासोबतच आरोग्य यंत्रणेला लसीकरण व अन्य कामाची जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. परिणामी आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करण्याचेही काम सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकंदरीत लीसीकरणाची चार महिन्यातील प्रगती ही २६ ते ३० ट्नयापर्यंतच आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्य संत्रणेची कसरत होणार असल्याने आरोग्य विभागावर ताण येणार आहे.