मराठी

विखे कारखान्याच्या कमर्चा-यांच्या कोरोना चाचण्यांना सुरुवात

दररोज २५० ते ३०० कामगारांच्या चाचण्या

नगर/दि. ३ –  जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारयाच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून कोरोनाविषयी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कारखान्याचे अध्यक्षआ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाèयांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विखे परिवाराने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले.
त्याचप्रमाणे कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या कामगारांच्या आरोग्याविषयी कारखाना व्यवस्थापनाला माहिती असली, तर योग्य ती काळजी घेता येईल, यासाठी या चाचण्या करण्यात येणार असल्याचे आ. विखे यांनी सांगितले. या चाचण्या करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नेमण्यात आली असून दररोज २५० ते ३०० कामगारांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्यांच्या अहवालानुसार कामगारांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button