मराठी

तूर-हरभरा अनुदान न मिळालेल्या लाभार्थ्यांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

जिल्हा पणन अधिका-यांनी केले आवाहन

अमरावती/दि. 21 – हंगाम 2017-18 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेत तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या, मात्र, खरेदी होऊ न शकलेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून प्रतिक्विंटल एक हजार रूपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अपूर्ण माहितीमुळे काहीजणांचे अनुदान अद्यापही वितरीत करता आले नाही. त्यामुळे संबंधितांनी सात दिवसांच्या आत खरेदी विक्री संस्थेकडे माहिती सादर करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिका-यांनी केले आहे.

योजनेनुसार काही पात्र शेतकरी बांधवांना त्यानुसार अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, आधार संलग्न बँक खाते तपशील, आधारकार्ड प्राप्त नसणे, संपर्क आदी अपूर्ण माहिती यामुळे काहींना अनुदानाचे वितरण करता आले नाही. त्यामुळे अशा शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेल्या तालुका खरेदी विक्री सह संस्थेकडे आपल्या नावाची शहानिशा करून बँक पासबुकची व आधारकार्डची झेरॉक्स प्रत सात दिवसांत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या संस्था जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडे यादी सादर करणार असून, त्यानंतर अनुदान वितरण करण्यात येणार आहे. ही कार्यवाही तत्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button