मराठी

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्या

गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

तिवसा दि २३ – टाळेबंदी काळात पथविक्रेत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा गोरगरिबांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आणली,मात्र यवतमाळ शहरातील बँक व्यवस्थापक स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गुरु युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, याबाबत स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी एम देवेन्‍द्र सिंह यांना गुरुदेव युवा संघाच्या वतीने देण्यात आले,
केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, पीएम निधी, योजना आणली टाळेबंदी काळात पथक विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे, पथविक्रेत्यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान स्वनिधी निधी योजना आणली, जिल्ह्यातील चिल्लर भाजी विक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज केला, नगरपरिषदेने अर्ज स्वीकारीत जवळजवळ सर्व अर्ज करणाऱ्यांना अअप्रूवल सुद्धा दिले, मात्र यवतमाळ शहरातील बँक व्यवस्थापक पॅन कार्ड आहे काय? एटीएम आहे काय? असे अनेक प्रश्‍न करून गोरगरीब जनतेला टाळाटाळीचे उत्तर देत असल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, काही दिवसातच हिंदुधर्माचा महत्त्वाचा सण असलेला दसरा-दिवाळी आहे यातच पथ विक्रेत्यांकडे पैसे नसल्याने ते व्यवसाय सुरु करु शकत नाही आहे, त्यातच बँक व्यवस्थापक पथ विक्रेत्यांना उडवाउडवीचे उत्तर देत आहे, या संपूर्ण प्रकाराचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांना देण्यात आले, दिलेल्या निवेदनातून टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज गेडाम यांनी केली आहे,

Related Articles

Back to top button