मराठी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

अमरावती, दि.6- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अभिवादन केले. शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीकडून अभिवादन कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.  जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये देशाच्या राज्यघटनेचा समावेश होतो. समता, बंधुभाव, न्याय अशा मानवतावादी श्रेष्ठ मूल्यांचा समावेश असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला. त्यांचे कार्य पिढ्यानुपिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.  अभिवादन कार्यक्रमाला माजी खासदार अनंतराव गुढे, किशोर बोरकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button