मराठी

भारती सिंगच्या जामीनअर्जावर आज सुनावणी

मुंबई/दि.२२  – ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स (NDPS) कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) दोघांना न्यायालयात हजर केले. एनसीबीने भारतीची न्यायालयीन कोठडी आणि हर्षची पोलिस कोठडी मागितली; परंतु न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. रविवारी सकाळी एनसीबीने 18 तासांच्या चौकशीनंतर हर्षला अटक केली. त्यांच्यावर अंमली पदार्थ अधिनियम 1986 चे कलम 27 ए लागू करण्यात आले आहे. त्यापूर्वी शनिवारी साडेतीन तासाच्या चौकशीनंतर भारती यांना अटक करण्यात आली. भारती यांनी एनसीबीच्या वूमन सेलमध्ये रात्र काढली. एनसीबीने रेडमधील भारती यांच्या घर व कार्यालयातून 86.5 ग्रॅम गांजा सापडला. तिने पती हर्षबरोबर गांजा घेतल्याची कबुली दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने भारती आणि हर्ष यांची ड्रग्ज पॅडलरसमोर चौकशी केली. त्यानंतर दोघांनी गांजा घेतल्याची कबुली दिली.
अमली पदार्थ बाळगणा-याने भारती व हर्ष यांचे नाव घेतले होते. यानंतर शनिवारी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील त्यांच्या घरावर आणि कार्यालयात छापे टाकण्यात आले. भारती यांच्या घरातील कर्मचा-यांचीही चौकशी केली गेली. एनसीबीच्या एका अधिका-याने सांगितले, की अशा प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा दहा हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारती सिंह एक स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. ती द कपिल शर्मा शोमध्ये काम करते. भारती यांनी 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. त्याने इंडियन लाफ्टर चॅलेंजपासून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का वूडू, स्टोरी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाइट बचाओ यासह अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले.

यांचीही चौकशी

अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली गेली आहे. 20 नोव्हेंबरला अर्जुन रामपालने बॉलिवूडमधील ड्रग्जसंदर्भात एका प्रकरणात एनसीबी ऑफिस गाठले. तिथे कित्येक तास चौकशी केली गेली. त्याचा लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्सच्या दोन दिवस आधी अर्जुनची चौकशी करण्यात आली. रामपालचा मित्र पॉल बार्टेल यालाही अटक करण्यात आली. तो 25 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. याशिवाय एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक केली. ती सध्या जामिनावर आहे. दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचीही चौकशी करण्यात आली.

Related Articles

Back to top button