मुंबई/दि.९ – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन याच्या विजयानंतर सोमवारी भारतीय बाजार आतापर्यंतच्या रेकॉर्ड उंचीवर पोहचला. स्थानिक शेअर बाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घटीसह खुला झाला. मुंबई शेअर बाजार सूचकांक 503.93 अंक म्हणजे 42 हजार 393.99 च्या स्तरावर खुला झाला. राष्ट्रीय. शेअर बाजार 135.85 अंकाच्या तेजीसह 12 हजार 399.40 अंकांवर खुला झाला. गेल्या सत्रात सेन्सेक्स 552.90 अंकांनी वाढून 41 हजार 893.06 च्या पुढे गेला होता. एनएसई निफ्टी 143.25 अंकांनी मजबूत होऊन 12 हजार 263.55 अंकांवर बंद झाला होता.
आज प्रमुख शेअर्समध्ये विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, ब्रिटानिया आणि श्री सिमेंटची सुरूवात तेजीने झाली. दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एसबीआय आणि एसबीआय लाइफचे शेअर लाल निशाणावर खुले झाले. सेक्टोरियल इंडेक्स बाबत बोलायचे झाले, तर आज सर्व सेक्टर्स हिरव्या निशाणावर खुले झाले. यात बँक, फायनान्स सर्विसेज, प्रायव्हेट बँक, मेटल, रियल्टी, पीएसयू बँक, मीडिया, एफएमसीजी, फार्मा, आयटी आणि ऑटो सामील आहे. वाढ झालेल्या शेअरबाबात बोलायचे झाले, तर आज आयसीआयसीआय बँक आणि बीपीसीएलचे शेअर 3-3 टक्क्यांच्या वर कारभार करत होते. क्सिस बँक आणि इन्फोसिसचे शेअर पण 2-2 टक्के तेजीत होते. दरम्यान, कोल इंडिया आणि अदानी पोर्ट या शेअरमध्ये हलक्या घटीसह कारभार सुरू होता.
अमेरिकन बाजार डाऊजोन्स 66.78 अंक खाली 28 हजार 323.40 वर बंद झाला. तर एसएंडपी 500 इंडेक्स 3,509.44 वर बंद झाला. तर नॅस्डॅक 13.28 अंक वर जाऊन 12 हजार 91.30 वर बंद झाला.
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात बाजारात 4,869.87 कोटी रुपयांची शुद्ध खरेदी केली होती. या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव 2.66 टक्के वाढून 40.50 डॉलर प्रतिपिंपावर गेला होता.