मराठी

ट्रम्प यांना शेवटच्या क्षणी मोठा धक्का

संरक्षण खर्चावरील व्हेटो नाकारला

वाॅशिंग्टन/दि.२ – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत मोठा झटका बसला आहे. अमेरिकन काँग्रेसने ट्रम्प यांच्या संरक्षण खर्च निधी, किंवा राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियमातील व्हेटो नाकारला आहे. ट्रम्प यांना गेल्या बुधवारी राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण कायद्यावर व्हेटो वापरण्याच्या वेळी तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला असला, तरी त्यांनी तेऐकले नाही. सल्लागारांचे न ऐकता व्हेटो काढला. त्याला अमेरिकन काँग्रेसने मतदानाच्या माध्यमातून नाकारले.
ट्रम्प यांच्या व्हेटोविरोधात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी मोठी भूमिका बजावली. अमेरिकन काँग्रेसने पुढील एक वर्षात देशाच्या संरक्षण धोरणावर 740 अब्ज डॉलर्स खर्च करण्यास मान्यता दिली. ट्रम्प यांनी विधेयकातील काही तरतुदींवर स्वाक्षरी करण्यास नकार दर्शविला. ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि युरोपमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याबाबतच्या तरतुदींवर आक्षेप घेतला होता; परंतु वरच्या सभागृहाने मतदान करून आपला व्हेटो काढून टाकला आहे. ट्रम्प यांनी चार वर्षांच्या मुदतीत आठ कायद्यांबाबत स्वतःचा अधिकार वापरला; परंतु ती त्या विधेयकांचे कायद्यात रुपांतर होऊ शकले नाही. या वर्षाच्या अखेरीस संसदेने एकत्रितपणे अध्यक्षांचा अधिकार नाकारला. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे संतप्त झाल्याने सिनेटने त्यांच्या विरोधात मतदान केले आणि ट्रम्पचा व्हेटो 81-113 च्या बहुमताने नाकारला गेला.
या मतदानादरम्यान ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनीही व्हेटो रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले. डेमोक्रॅटिक पक्षाने हे विधेयक केल्याबद्दल अध्यक्षांवर जोरदार टीका केली. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे संसदेच्या सभागृह प्रतिनिधी नॅन्सी पॅलोसी यांनी सांगितले.

Back to top button