मराठी

वीर शहिद भगतसिंग यांची जयंती

शहिद भगतसिंग बहुउद्देशीय संस्था द्वारा

वरुड/दि. २९ – शहिद भगतसिंग बहुउद्देशीय संस्था द्वारा वीर शहिद भगतसिंग यांची ११३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहिद भगतसिंग बहुउद्देशीय संस्था, वरुड रजि. क्र. महा/२१४/२० द्वारा वीर शहिद भगतसिंग यांची ११३ वी जयंती संस्थेचे उपाध्यक्ष हिराचंद पवार यांच्या निवासस्थानी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कुलदीप पंडागळे, उपाध्यक्ष हिराचंद पवार, सचिव जितेंद्र शेटीये, सहसचिव दिपक निंबाळकर, कोषाध्यक्ष पंकज बोराडे, सदस्य अश्फाक शाह, दिगंबर बानाईत, प्रतिक्षा खापरे, तेजस शेरेकर, विष्णू तिखिले प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button