मराठी

अभाविपच्या विद्यार्थ्यावरील अमानुष मारहाणीचा निषेध

भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी जतवीला

अमरावती/दि. २६ – अखिल भारतीय विध्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांवर आज धुळे पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारच्या घटनेचा अमरावती भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी निषेध केला आहे.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शैक्षणिक शुल्क कमी करणे व विविध मागण्यांसाठी अभाविपचे विद्यार्थी आज धुळे शहरात गेले होते तेथे विद्यार्थ्यांचे साधे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सत्तार यांच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी अमानुष मारहाण केली या घटनेचा अमरावती जिल्हा ग्रामीण भाजपाने तीव्र निषेध केला आहे.जनमताचा अनादर करून सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांवर अत्याचार करीत असल्याचे निवेदिता चौधरी यावेळी म्हणाल्या

Back to top button