मराठी

भाजपच्या सरपंचांची गोळ्या घालून काश्मीरमध्ये हत्या

कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी....

काश्मीर/दि. ६ – दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button