मराठी

भाजपच्या जाहीरनाम्यांत १९ लाख युवकांना रोजगाराचे आश्वासन

पाटणा/दि.२२  – बिहार विधानसभा निवडणुकांविषयी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘आत्मनिर्भर बिहार का रोडमॅप’ या जाहीरनाम्यामध्ये एक लक्ष्य, 5 सूत्र आणि 11 संकल्पांचा उल्लेख आहे. 19 लाख लोकांना रोजगार देणे आणि बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार आहेत.
जाहीरनाम्यात लालूप्रसाद -राबडी यांच्या 15 वर्षांच्या आणि त्यानंतरच्या नितीशकुमार यांच्या 15 वर्षांच्या कामगिरीची तुलना करण्यात आली. 11 वेगवेगळ्या क्षेत्रांत आलेल्या बदलांची तुलना करण्यात आली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे, की लालूप्रसाद यादव-राबडी यांच्या 15 वर्षांच्या औद्योगिक उत्पादनाचा कोणताही डेटा मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही घोषणापत्रात याची जागा रिकामी ठेवली आहे. आमच्या 15 वर्षांच्या शासनात औद्योगिक विकासात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जाहीरनाम्यामध्ये 15 वर्षे विरुद्ध 15 वर्षे असा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात लालूंच्या काळात राज्य सरकारने काय केले, त्यानंतर नितीशकुमार सरकारने काय केले हे दाखवण्यात आले. तांत्रिक शिक्षणात 15 वर्षांच्या लालूप्रसाद यादवांच्या काळात काय स्थिती होती आणि आता शासनात काय स्थिती आहे, भाजपने दाखविले आहे. लालूप्रसाद-राबड़ी यांच्या 15 वर्षांच्या काळात दरडोई उत्पन्न आठ हजार होते, संयुक्त जनता दलाच्या आणि भाजप युतीच्या काळात दरडोई उत्पन्न वाढून ते 43 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले.

आत्मनिर्भर बिहारची पाच सूत्रे

  1. स्वस्थ समाज, आत्मनिर्भर बिहार
  2. शिक्षित बिहार, आत्मनिर्भर बिहार
  3. गाव-शहर, सबका विकास
  4. सशक्त कृषी, समृद्ध किसान
  5. उद्योग आधार, सबल समाज

11 संकल्प

  1. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस
  2. मेडिकल, इंजीनियरिंगसह तांत्रिक शिक्षण आता हिंदीमध्ये
  3. तीन लाख शिक्षकांची नियुक्ती
  4. आयटी हब विकसित करून पाच वर्षांत 5 लाख रोजगार
  5. एक कोटी महिलांना स्वावलंबी बनविणार
  6. एक लाख लोकांना आरोग्य विभागात नोकरी
  7. 2024 पर्यंत एम्स सुरू करणार
  8. धान आणि गव्हानंतर आता डाळींनाही किमान हमी भाव
  9. 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घरे
  10. दोन वर्षांमध्ये खासगी आणि कॉम्फेड आधारित 15 नवीन प्रोसेसिंग उद्योग आणू
  11. पुढच्या दोन वर्षांमध्ये गोड पाण्यात पाळण्यात येणाऱ्या माश्यांच्या उत्पादनात राज्याला देशात नंबर एक राज्य बनवू.
  12. बिहारचे दहा हजार नवीन शेतकरी उत्पादन संघांना आपसात जोडून राज्यभरातील विशेष पीक उत्पादन म्हणजेच, मक्का, फळे, चूडा, मखाना, पान, मसाला, मेंथा, औषधीय रोपांची सप्लाय चेन विकसित करु. त्यामुळे दहा लाख लोकांना रोजगार

Related Articles

Back to top button