मराठी

करोना पीडितांच्या मदतीसाठी भाजपाचा सेवा सप्ताह

अमरावती/दि.३०करोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी अमरावती ग्रामीण भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात सेवा सप्तहा राबविण्यात येत आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटीसह  खाजगी कोविड सेंटरवर जाऊन करोना रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे,मास्क,आवश्यकतेनुसार रक्त,प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात आला.भाजपा ग्रामीणच्या वतीने ज्या करोनाग्रस्त रुग्णाच्या घरी बालके ,व अन्य नातेवाईक आहे ज्यांची परिस्थिती बिकट आहे अश्या गरजूंना गेल्या अनेक दिवसांपासून घरपोच जेवणाचे डबे व रुग्णासाठी औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.आज  विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात करोना ग्रस्त रुग्णासाठी व  त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे व इतर सामग्री उपलब्ध करून देण्यात आली यावेळी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी,केंद्रीय कृषी आघाडीचे महामंत्री डॉ अनिल  बोंडे,आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे,बाळासाहेब वानखडे,विकास पाटील इंगोले,प्रशांत शेगोकर, राजेश पाठक, अतुल बनसोड,राजू चिरडे,बादल कुळकर्णी, सपकाळ व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.करोना रुग्णांना उपचार घेतांना काहीही कमतरता भासल्यास विनासंकोच भाजपाच्या कार्यकर्त्यांना संपर्क करावा त्यासाठी भाजपाने संपर्क क्रमांक जाहीर केले असून रुग्णालयात कार्यकर्ते उपस्थित आहे असे आवाहन जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी यावेळी केले.

Related Articles

Back to top button