मराठी

भाजपचे आता पश्चिम बंगालवर लक्ष्य

नवी दिल्ली/दि.१३ – बिहारमधील भाजपच्या यशामुळे पुढच्या वर्षीच्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठरविले आहे. येथे निवडणूक लढाई जिंकणे पक्षाला काहीसे अवघड आहे.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 34 वर्षांची माकपची सत्ता उलथवून टाकली. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्डी यांचे नाव नोंदले गेले. त्यांनी २०१५- 2016 च्या निवडणुका पुन्हा जिंकल्या. राज्यातील डाव्या विचारसरणीचे उच्चाटन करण्याचे काम ममतांनी केले आहे. आता मात्र ममता यांचा लढा डाव्यांशी नसून भाजपशी आहे. भाजपने गेल्या तीन वर्षांपासून पश्चिम बंगाल जिंकण्याची तयारी केली आहे. तथापि, या राज्यातील भाजपची वाटचाल बिहारइतकी सोपी नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. भाजपला येथे सत्तेपर्यंत पोचण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. राज्य पातळीवर पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्षाचा मार्ग कठीण होऊ शकतो. पश्चिम बंगालमधील निवडणुका बिहारच्या तुलनेत अधिक हिंसक होतील, अशी भीती आहे. पश्चिम बंगालमध्ये डावे, काँग्रेस आणि ममतांनी एकत्र निवडणुका लढल्यास भाजपचा मार्ग कठीण होऊ शकतो; परंतु हे समीकरण अवघड आहे.
पश्चिम बंगालमध्ये डावे कमकुवत झाले आहेत; परंतु संपलेले नाहीत. उलट, बिहारमध्ये डाव्यांना चांगलेच यश मिळाले. त्यामुळेच डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या जेएनयूकडे जाण्यासाठी भाजपने सहकार्य केले. दोन वर्षांपासून पडद्यामध्ये लपून टेवलेल्या विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करून भाजपने डाव्या पक्षाला  आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर भाजपने विवेकानंदांच्या पुतळ्याद्वारे लक्ष्य केले आहे.

 

Related Articles

Back to top button