मराठी

विनाअनुदानित शिक्षकांनी साजरा केला काळा दिन

शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा केला विरोध

बीड/दि.५ – आज शिक्षक दिनी सर्व समाजातील स्तरातून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त झाली, पण विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मात्र चित्र उलट आहे. कामाच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. बीडमधील अशा नाराज शिक्षकांनी आज काळा शिक्षक दिन साजरा केला.
बीडमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. आपल्याला पगार मिळावा, या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. विनाअनुदानित शिक्षकांना मान्यता आणि त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा आदेश निघाला; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या दिवशी दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला. शिक्षकांनी हाताला काळ्या फिती लावून आणि काही शिक्षकांनी काळे कपड़े घालून  निषेध केला. जीआरची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने संतप्त शिक्षकांनी आज हे आंदोलन केले. या वेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा विरोध केला.

Related Articles

Back to top button