मराठी

अबु आसीम आजमींचा जन्मदिवसनिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबीर

५० रक्तदात्यांव्दारे रक्तदान

अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – कोरोना काळात रक्ताचा अभाव जाणवत आहे, अशात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आजमी यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यकत्र्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात ५० कार्यकत्र्यांव्दारे रक्तदान करण्यात आले. जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्याऐवजी आजची गरज बघता पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी जिल्हा सामन्य रूग्णालयातील ब्लड बँक मध्ये रक्तदान शिबीराचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सलीम जावेद खान उर्फ बबलु , इमरान खान, तनवीर मिर्जा, वहीद खान, सईद खान, मोहम्मद सलीम, जकी नसीम, मोहम्मद आसिफ, मोहसीन खान, अन्वर राजा, रिजवान भाई, शेख अहफाज, शाकीर पहेलवान, अजमत भाई, नसीम , मसुद खान आदिंसह नागरिक, कार्यकर्ता शिबीराला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button