मराठी

बीपीसीएलमधील निर्गुंतवणुकीतून

सरकारला हवेत नव्वद हजार कोटीभारत पेट्रोलियम कार्पोरशन लिमिटेड

मुंबई/दि.२ – भारत पेट्रोलियम कार्पोरशन लिमिटेड (बीपीसीएलमधील) चे  भागभांडवल विकून सरकारला नव्व कोटी रुपये मिळवायचे आहेत. केवळ समभागांची किंमतच नाही, तर मालमत्ता मूल्य बघून जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.
बीपीसीएलमध्ये केंद्र सरकार आपला 52.98 टक्के  हिस्सा विकणार आहे, त्यासाठी तीन कंपन्या स्पर्धेत आहेत. तथापि, सरकारने नव्वद हजार कोटी मिळवण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सध्या बीपीसीएल शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करीत असलेल्या रकमेच्या ते दुप्पट आहे. शुक्रवारी बीएसईतील कंपनीचा समभाग 0.54 टक्के वाढीसह 383 रुपये प्रति समभागांवर बंद झाला. एनएसई वर त्याचा समभाग 0.37 टक्क्यांनी ढून 382.50 वर बंद झाला. बीपीसीएलची लक्ष्य किंमत प्रति शेअर पाचशे  रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका अधिका-याने सांगितले, की बीपीसीएलला त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या बरोबरीने सरकारला बेंचमार्क करायचा आहे. जर केंद्र सरकार बीपीसीएलमधील आपला भाग केवळ सध्याच्या शेअर्सच्या भावावर विकण्याचा विचार करीत असेल, तर ते चुकीचे आहेत. सरकार कंपनीच्या मालमत्ता मूल्यांकनाकडेही पाहत आहे. केवळ मालमत्ता विक्री केल्यास 45 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. केंद्र सरकार आपल्या समभागांची तुलना बीपीसीएलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअर्सशी करत आहे. या अधिका-याने सांगितले, की बीपीसीएलकडे इतकी मालमत्ता आहे, की कंपनीच्या मूळ व्यवसायाशी छेडछाड न करता सरकार विक्री करुन 45 हजार कोटी रुपये सहजपणे जमा करू शकते. एम्के ग्लोबलच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की बीपीसीएलचा देशातील किरकोळ पेट्रोलियम उत्पादनांमध्ये वीस टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. बीपीसीएलच्या दहा लाख पेट्रोल पंप आणि गॅसच्या भांडवलावर कंपन्यांची नजर आहे. पेट्रोनेट एलएनजी आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड व्यतिरिक्त मोझांबिक गॅसचेही बीपीसीएलमध्ये समभाग आहेत.
बीपीसीएलच्या समभागांमध्ये दीर्घ मुदतीत सध्याची किंमत दुप्पट करण्याची क्षमता आहे. आरआयएल-बीपी आणि अन्य कंपन्यांमधील कराराची तुलना केल्यास बीपीसीएलचे मूल्य ऐंशी हजार ते एक लाख कोटी रुपये असेल. बीपीसीएलची मोठी रिफायनरी क्षमता आणि हायड्रोकार्बन खाण व उत्पादनही गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे. तसेच, कंपनीचे इतर व्यवसाय जसे की उत्पादन, पाइपलाइन, एलपीजी, औद्योगिक इंधन, एटीएफ इत्यादी देखील कंपनीचे मूल्यांकन वाढवते. सरकारी भागभांडवल खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे दोन खाजगी इक्विटी गुंतवणूकदार फर्म (पीई इन्व्हेस्टर्स फर्म) अपोलो ग्लोबल मॅनेजमेन्ट आणि आय स्कायवर्ड आय स्क्वेअर कॅपिटलच्या युनिट थिंक गॅसने निविदा भरल्या आहेत. या दोन खासगी कंपन्यांनी बीपीसीएल खरेदीसाठी बोली प्रक्रियेत उडी घेतल्याने कंपनीमधील सरकारची भागीदारी स्पर्धात्मक व उत्साहपूर्ण बनली. यामुळे सरकारला जास्त किंमतीत बीपीसीएलचे मूल्यांकन करण्याची अपेक्षादेखील वाढली आहे.

Related Articles

Back to top button