मराठी

मध्य प्रदेशात कोरोना नियमांची ऐसी की तैसी!

कलश यात्रा वादाच्या भोव-यात

इंदूर/दि. १० – मध्य प्रदेशमधील(MADHYA PRADESH) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इंदूरमधील सांवेर मतदारसंघामध्ये कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. सात सप्टेंबरपासून येथे वेगवेगळ्या भागांमधून भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ कलश यात्रा निघत आहेत. इंदूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही नियमांचे उल्लंघन करुन राजकीय नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनासंदर्भातील नियमांचेही या यात्रांमध्ये पालन केले जात नाही. ‘सोशल डिस्टन्सिंग‘(SOCIAL DISTANCING)च्या नियमांचेही पालन केले जात नसल्याचे चित्र या यात्रांदरम्यान दिसत आहे. यात्रांमध्ये सहभागी झालेले समर्थक मुखपट्टी घालत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. ‘सोशल मीडिया‘वर या कलश यात्रेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनकर यांच्यासहीत सहा जणांविरोधात तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.
सांवेरमधील रालामंडल, झलारिया, निगनोटी, बूढी बरलाई, पीर कराडियासहीत १५ वेगवेगळ्या ठिकाणी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नर्मदा कलश यात्रेच्या नावाखाली या यात्रांचे आयोजन करण्यात येत असून भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या हेतूने हे आयोजन केले आहे. या कलश यात्रा राज्यमंत्री असणाèया तुलसी सिलवाट यांच्या समर्थनार्थ काढण्यात आल्या. या कलश यात्रांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्र आल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर इंदूरचे पोलिस उपनिरीक्षक हरिनारायण चारी मिश्री यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात दोषी आढळणार्याविरोधात कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. इंदूरमधील सांवेर, धरमपुरी आणि चंद्रावती गंज पोलीस स्थानकांमध्ये सहा लोकांविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या विरोधकांनी या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button