मराठी

सेक्स रॅकेट चालविणा-या पक्ष सदस्यांना घातल्या गोळ्या

 प्योंगयांग : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे महासचिव असलेल्या किम जोंग उन यांच्या लहरी व कठोर कारवाईचे अनेक प्रकरणे समोर येत असतात. सेक्स रॅकेटविरोधात कारवाई करण्यास किम यांनी सुरुवात केली आहे. सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सहा जणांना किम यांच्या आदेशाने ठार करण्यात आले. यामध्ये चौघेजण त्यांच्याच पक्षाचे सदस्य होते.  वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या तरुणी या शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाèयांना मृत्यूदंडाचा आदेश खुद्द किम यांनी दिला असल्याचे एका अधिकाèयाने सांगितले. किम यांच्यासमोर दोषींवर गोळ्या झाडण्यात आल्या. हे दोषी मागील काही वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवत होते. या सेक्स रॅकेटमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांचे नाव समोर येताच किम यांनी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले. या सेक्स रॅकेटमध्ये प्योंगयांगमधील काही अधिकाèयांचा समावेश होता. वेश्या व्यवसाय करणाèया विद्यार्थिनींना अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवत प्रति महिना ५०० डॉलर इतकी रक्कम देण्यात येत होती.  या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणींचे सरासरी वय २० वर्षे आहे. विद्यार्थिनींनी या सेक्स रॅकेटबाबत पोलिसांना माहिती दिली. या पीडितांना सुरुवातीला पैसे देण्यात आले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आणि आरोपींना अटक केली. ..

Back to top button