मराठी

नवजात जीवंत बाळाला श्मशानभूमित पुरल

झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातील घटना

झारखंड/दि.९-  माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात घडली आहे. येथे काही अज्ञातांनी स्मशानभूमीत एका नवजात बाळाला जिवंत पुरल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीतून अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ही घटना कळली. हा प्रकार समजल्याने बाळाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरू पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.
चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एका  नवजात बाळाला जिवंत पुरण्यात आले. स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला.या व्यक्तीने घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा त्याला एक बाळ कोणीतरी मातीत पुरल्याचं दिसलं. बाळावर माती टाकण्यात आली होती. व्यक्तीने नवजात बाळाला मातीतून सुखरूप बाहेर काढलं आणि बाळाचा जीव वाचवला आहे. स्मशानभूमीत बाळाला पुरल्याची माहिती मिळताच कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध मुरारी कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. याप्रकरणी चौकशी सुरू असून बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Back to top button