मराठी

चार दिवसाचे लॉकडाऊन रद्द करा

नविन प्रतिष्ठान व सर्व युवा दुकानदाराची मुख्याधिका:यांकडे मागणी

वरुड दी २६ – २४ ते २७ सप्टेंबर २०२० ला होणारे लॉकडाऊन रद्द करा, अशी मागणी करणारे निवेदन युवा दुकानदार, नविन प्रतिष्ठाने यांनी मुख्याधिका:यांना नुकतेच सादर केले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सद्य:ची परिस्थिती खुप काळजीची आहे आणि आम्हाला जाणीव आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घेवुन सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे. कोरोनाचा वाढता प्रसार थांबला पाहिजे पण लॉकडाऊन रद्द करण्यात यावे. कारण यामुळे अधिक लॉकडाऊन काळामुळे आर्थिक परिस्थिती धासाळलेली आहे. खुप दुकानदार कर्जबाजारी झाले आहे व यामुळे आणखी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असुन तो सद्य:च्या काळात शक्य नाही व अशा सततच्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील नवीन व छोट्या दुकानदाराची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. आम्ही कोरोना प्रसारापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत नसुन या अशा लॉकडाऊन पेक्षा, सुरक्षा, शिस्त व नियमांचे पालन या बद्दलची जनजागृती यावर अधिक भर देवुन ४ दिवस लॉकडाऊन न ठेवता कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्व दुकानदारांना योग्य त्या नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावेत व नियोजित लॉकडाऊन रद्द करावे, अशी मागणी युवा दुकानदार आणि नवीन प्रतिष्ठान यांनी मुख्याधिका:यांना केली आहे.
सदर निवेदन देणा:यांमध्ये मनिष प्रिन्टर्स, शिवम स्पोर्टस्, आदित्य कलेक्शन, साई श्रद्धा कलर पेंट, माऊली ऑनलाईन सेंटर, न्यु फॅशन गॉरमेंटस्, वैष्णवी चायनीज सेंटर, श्रीजी फ्लेक्स पॉईंट, साई प्रिंटर्स, स्पेशल बॅग हाऊस, माताराणी मेन्स वेअर, श्री साई असोसिएटस्, राज असोसिएशन, राज असोसिएट्स, साईराम झेरॉक्स, साईराम ऑनलाईन सेंटर, पाटणकर प्रॉपर्टी सोल्युशन, राहुल प्रिंटर्स, रिधम मोबाईल, शिवकृपा फोटो स्टुडिओ, गुरुकृपा ऑनलाईन सेंटर, महाकाल फुल भंडार, मिलींद लेकुरवाळे, माधव अकर्ते, निखील टाकरखेडे, अनुप लेकुरवाळे, विष्णु पाचवे यांचेसह अन्य युवा दुकानदार, नविन प्रतिष्ठान मालकांचा समावेश होता.

Related Articles

Back to top button