मराठी

विजय घोरमाडेंच्या दुकानाचा परवाना क्र मांक रद्द करा

एकलविहीर ग्रामवासियाची तहसिलदाराकडे मागणी

वरुड दि.१४ – येथुन जवळच असलेल्या एकलविहीर येथील विजय घोरमाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये भ्रष्टाचार करत असुन यांची सखोल चौकशी करुन दुकानाचा परवाना क्र मांक रद्द करा, अशी मागणी एकलविहीर ग्रामवासियांनी तहसिलदारांसह अन्नधान्य पुरवठा निरीक्षकांकडे केली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आम्ही एकलविहीर गावातील जनता असुन आमच्या सोबत स्वस्त धान्य दुकानदार राशनमध्ये नावे असणा:या सर्व लोकांचा माल पुरेसा ग्राहकांला देत नाही. नविन राशनकार्ड बनतेवेळी एक ते दोन हजार रुपयांची मागणी करतो. ज्याला अंत्योदय धान्य मिळत असेल त्याला काही विचारपुस करण्याकरिता गेला असता तरीही त्याला शेतकरी कार्ड मध्ये टाकण्याची धमकी देतात. आम्ही इलेक्ट्रीक काट्यांची मागणी केल्यास तरी ही आम्हाला जे आहे ते आहे आणि तुमच्या कडुन जे होईल ते करुन घ्या असे उत्तरे देतात. राशन कार्डमध्ये ६ लोकांची नावे असेल तर तेथे ५ लोकांचा माल दिला जातो. आदिवासी स्त्रियांसोबत अभद्र शब्दांचा वापर करतात. त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आणुन दिल्यावर सुद्धा तुम्ही तहसिल कार्यालयावर जा किंवा आमदाराजवळ जा काही होणार नाही असे शब्द वापरतात. त्यांच्या दुकानावर कोणत्याही प्रकारचा भाव फलक नाही म्हणुन गावक:या जवळुन १ कार्ड मागे ३० ते ४० रुपयांची लुट करतात. दुकानदार हा महिन्यात १ ते २ दिवसच दुकान चालु ठेवुन त्याच दिवशी धान्याची वाटप करतात बाकी दिवस आम्ही धान्याची मागणी केल्यास धान्य देत नाही.
सदर ही माहिती गावक:यांची असुन या दुकानाची चौकशी तसेच ग्राहकांच्या घरी जावुन चौकशी करण्यात यावी लवकरात लवकर या दुकानाचा भ्रष्टाचार बाहेर काढुन विजय घोरमाडे यांचा दुकानाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी एकलविहीर ग्रामवासियांनी तहसिलदारांकडे केली आहे.
यावेळी पोलिस पाटील प्रमोद ढोके, राहुल कवडेक, मुकेश धुर्वे, शंकर सिरसाम, राजु खवसे, सुभाष तिडगाम, संजय सिरसाम, श्रीराम ढोके, संजय कवडेक, कैलाश ढोके, कृपाल सिंदराम, निलेश उईके, राहुल सिरसाम, राजु खवसे, रविंद्र ढोके, गणपत उईके, परमेश्वर कवडेक, आसाराम बुवाडे, भारत नारनवरे, संदीप ढोके, आकाश लिडगाम, बाल्या उईके, राहुल कुळसंगे, प्रकाश गोहिते, सुभाष तिडगाम, रामदास ढोके, शंकरराव बुवो, शामराव कुसराम, पुरुषोत्तम तिडगाम यांचेसह आदीं उपस्थित होते.

Related Articles

Back to top button