मराठी
कॅण्डल मार्च” काढून टिमटाळावासियांची महामानवाला आदरांजली
टिमटाळा दि. ८ – पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणाऱ्या टिमटाळा येथे
विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावातून कॅण्डल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वभुषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनी परिसरातून साफसफाई करण्यात आली. त्यानंतर गावातील जमलेल्या सर्वच बौद्ध उपासिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सम्राट फाउंडेशनचे मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांच्या हस्ते अर्ध्यावर ध्वजारोहण करून सामुहिकपणे दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
सामुहिक परित्राण पाठ व अभिवादनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
सायंकाळच्या सत्रात सर्वच बौद्ध उपासिकांनी एकत्र येऊन कॅण्डल मार्च चे आयोजन केले. उपस्थित सर्व अनुयायांनी हातात मोमबत्ती प्रज्ज्वलीत करून शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत गावातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. काळोखाची रात्र व थंडीची पर्वा न करता गावातील सर्वच लहानांपासून मोठ्यांपर्यंत हातात मोमबत्ती प्रज्ज्वलीत करून एकामागोमाग चालत होते.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळील परिसरात उपस्थितांच्या हातातील मोमबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामुहिक परित्राण घेऊन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायतचे उपसरपंच माया कोटांगळे, सुधिर वैद्य, सुनील तिडके, ज्ञानेश्वर भडके, मिलिंद कोटांगळे, पार्वताबाई कठाणे, सुभाष साखरे, सुमेध कटकतलवारे, पुरुषोत्तम सहारे, प्रफूल कटकतलवारे, संकेत कोटांगले, आनंदा गडलिंग, चंद्रकांत भडके, आयुष वाहाणे, अक्षय भडके, आकाश तिडके, यथार्थ भडके, साहिल कोटांगळे, जिवन वैद्य, प्रतिक तिडके, यशार्यन सहारे, परमानंद तिडके, मयुर भोवते, सचिन कोटांगळे यांचे सहित भिमराज मित्र मंडळ व सम्राट फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि महिला उपासिका उपस्थित होते.