मराठी

कापुसतळणी मधील निःशुल्क आरोग्य शिबीरात ९२ रुग्णांवर झाले उपचार

झेप महिला ग्राम संघ, कापुसतळणी द्वारा यशस्वी आयोजन

मानवसेवा पैरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या चमु कडून योग व निसर्गोपचार द्वारे उपचार
अंजनगाव सुर्जी/दी १०- (ता.प्र.)येथील ग्राम कापुसतळणी मधील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दि. ९ डिसेंबर ला सकाळी ११ ते दुपारी ५ निःशुल्क योगा व निसर्गोपचार उपचार शिबीर स्थानिक झेप महिला ग्राम संघ तर्फे आयोजित करण्यात आले होते. या शिबीर मध्ये ९२ ग्रामस्थांनी यशस्वी उपचार घेतले. निसर्गोपचार तज्ञ डॉ नंदकिशोर पाटील व डॉ अक्षय चौधरी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पेशंटवर उपचार केले. यामध्ये योगासन, माती चिकित्सा, जल चिकित्सा, एक्यूप्रेशर, मसाज चिकित्सा, सुजोक, आहार चिकित्सा, योगा, प्राणायाम व निसर्गोपचार पद्धतीने सर्व आजारांवर यशस्वी उपचार करण्यात आले.  गावक-र्यांनी भरभरुण प्रतिसाद दिला. मानवसेवा पैरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलची भारत सरकारच्या आयुष मंत्रालय मध्ये नोंदणी झालेली आहे. तसेच या हॉस्पिटल मध्ये सर्व आजारावर यशस्वी उपचार करण्यात येतात. शिबीर संपल्यावर विद्यार्थी प्रथमेश गिरनाडे चा केक कापुण वाढदिवस साजरा करण्यात आला.
           यावेळी बचत गट विभागाचे श्रीकांत ठाकरे व सागर देवकर उपस्थित होते. संपूर्ण शिबीराचे आयोजन सौ दर्शना गिरनाळे व झेप महिला ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी दीपाली दातीर, गायत्री रेखाते, आँचल सोनोने, नेहा सोंनपरोते, प्रथमेश गिरनाडे, ऋषिकेश पाटील, केयूर पटेल, तेजल धर्मे, संजना दामधर, निखिल भगत, रईस खान तसेच कॉलेजच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीने प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button