मराठी

न्यायालयाच्या आदेशाने खडसेंविरुद्ध गुन्हा

हॅकरमुळे नव्हे, तर जमीनखरेदी नडली

नवीदिल्ली/दि. ११ –  माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या(HIGH COURT) आदेशाने एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. खडसे यांना हॅकर्समुळे नाही, तर एमआयडीसीची जमीन खरेदी नडली, अशा  शब्दांत त्यांनी  खडसे यांच्यावर टीका केली.
खडसे यांना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे, तर एमआयडीसी(MIDC) जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असे सांगून फडणवीस म्हणाले, की खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत; पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. भंगाळे प्रकरणात खडसे यांना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला. जमीन घेत असताना खडसे पदावर होते. त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कारण नाही. आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू.
फडणवीस यांच्या या दाव्यानंतर, खडसे म्हणाले, “फडणवीस म्हणतात, त्यापेक्षा मी जास्त संयमी आहे. मी पाच वर्षे झाली सहन केले. एमआयडीसी प्रकरणात कुठल्या कारणासाठी राजीनामा घेतला? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लिम व्यक्तीची होती. 2010 पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सात-बारा उताऱ्यावर होते. 2010 नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे पाहूनच माझी बायको आणि जावयाने ती जमीन खरेदी केली आहे. मी खरेदी केली नाही. जर मी ती जमीन खरेदी केली असेन तर मी त्यात दोषी आहे; पण बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर त्यात मी दोषी कसा?”

Related Articles

Back to top button