मराठी

सीबीआयचे पथक मुंबईत दाखल

क्वारंटाइनमधून दिली सूट

मुंबई दि.२० – सुशांत सिंह राजपूत (SSR Case) प्रकरणाची चौकशी करण्यासीठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. महत्वाचे म्हणजे या 16 सदस्यीय सीबीआयच्या पथकाला क्वारंटाइनमधून सूट देण्यात आली आहे. या पथकाने बीएमसीकडे क्वारंटाइनमधून सूट मिळावी, अशी मागणी केली होती. यानंतर बीएमसीने त्यांची ही मागणी मान्य केली आहे. सीबीआय येथे मुंबई पोलिसांकडून क्राईम सीनचे फोटो घेईल. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या एसआयटीचे पथक तंत्रज्ञान, फोरेंसिक आणि टीएफसीचीही मदत घेईल. सुशांतच्या घरी पुन्हा दुसऱ्यांदा क्राईमसीन क्रिएट केला जाईल. हे पथक या प्रकरणाची चौकशी बिहार पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार करणार आहे. या एसआयटीचे नेतृत्व सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशिधर करत आहेत.
बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनय तिवरी यांना करण्यात आले होते क्वारंटाइन –
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनय तिवरी यांना महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केले होते. हाच नियम सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाही लागू असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार या अधिकाऱ्यांचा मुक्काम मुंबईत सात दिवसांहून अधिक कालावधीचा असल्यास त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. मात्र त्यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेतल्यास त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतून सूट मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने महापालिकेशी ई-मेलद्वारे संपर्क साधला असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयचे अधिकारी शासकीय कामानिमित्त मुंबईत येत असून, त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. यामुळे नियमानुसार त्यांना क्वारंटाइन कालावधीतून सूट देण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात, सीबीआयचे अधिकारी सरकारी कामानिमित्त मुंबईत येत आहेत. त्यांनी क्वारंटाइनमधून सूट मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना सूट देण्यात आली आहे, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button