मराठी

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा उपक्रम साजरा

अमरावती/दी.२१- संपूर्ण भारतात “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत असून अमरावती महानगरपालिका मा.आयुक्त महोदय यांच्‍या आदेशानुसार अमरावती महानगरपालिका अंतर्गत “आझादी का अमृत महोत्सव” व “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” चा उपक्रम मध्ये नमूद मुद्दे नुसार दिनांक २१/१२/२०२१ रोजी अमरावती महानगरपालिका दक्षिण झोन क्रमांक ४ बडनेरा मधील प्रभाग क्र.१९,२०,२१,२२ द्वारे मनपा शाळा क्र.३ व १० उर्दू माध्यम व मनपा शाळा क्र.७ मराठी माध्यम विद्यार्थी करिता “आझादी का अमृत महोत्सव” व “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” ची जनजागृती करिता टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच उत्कृष्टरित्या साफ सफाई चे काम करणारे महिला व पुरुष सफाई कामगार यांचा सत्कार, स्वच्छता बाबत नेहमी क्रियाशील असणाऱ्या नागरिकांचा व समाजातील जेष्‍ठ नागरिक जे स्वच्छता बाबत सहकार्य करतात स्वच्छता चॅम्पियन श्री कुकडे व विनायक घिमे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अमरावती महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वर्गीय विनायक झामरकर यांचा स्‍मृती निमित्त  व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेता दक्षिण झोन स्वच्छता विभागाचे मनपा सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. या चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाहून “तारे जमीन पे” चित्रपट सारख्या प्रसंग निर्माण झाले असता याप्रसंगात मनपाचे शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, नगरसेविका सौ.गंगाताई अंभोरे, दक्षिण झोन क्र.४ सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.सिमा नैताम, स्‍वच्‍छ भारत अभियान अमरावती शहर समन्‍वयक डॉ.श्‍वेता बोके यांच्‍या द्वारे अधिनस्त मान्यवरांच्‍या हस्ते बुके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी झोन क्र.४ चे जेष्‍ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्‍याव, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुलकर्णी, विनोद टांक, एस.जे. माहुलकर, श्री.राठोड, श्री.इमरान, मिथुन ऊसरे यांच्‍या सहित सर्व बिटप्‍युन विशाल कैथेल, राजू मारवे, राम समुदरे, संजय करिहार, सर्व सफाई कामगार तसेच मनपा शाळा क्रमांक ३, ७ व १० चे सर्व मुख्याध्‍यापक व सर्व शिक्षक वर्ग यांनी आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चे कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button