केंद्र शासनाच्या दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
अनुषंगीक माहिती www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती, दि. 10 : दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाने सन 2020 या वर्षाकरीता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहे. या अंतर्गत प्राप्त अर्जामधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दिव्यांग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमूना केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी आपले प्रस्ताव चार प्रतीत समाज कल्याण कार्यालयाकडे दि. 21 ऑगस्ट पर्यंत सादर करावे. अर्ज विहीत नमून्यात इंग्रजी व हिंदीमध्ये संक्षिप्त माहितीसह सादर करणे अनिवार्य राहील. या संदर्भात संबंधीतांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.