सीईटी वेळापत्रकात बदल
मुंबई दी २ – राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाणार असल्याने राज्य शासनातर्फे सीईटी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक 21 सप्टेंबरला जाहीर केले होते; परंतु विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांच्या तारखा लक्षात घेता सीईटीच्या वेळापत्रकात दुरुस्तीची मागणी झाल्याने पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता 10 ऑक्टोबर पासून सीईटी परीक्षांना सुरुवात होणार असून, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते यावर्षी कोरोनामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक स्थगित करण्यात आले होते. जेईई मेन्स, ‘नीट’ सारख्या परीक्षा घेतल्या गेल्यानंतर सीईटी सेलमार्फत राज्यस्तरीय सीईटी परीक्षांचेही वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते; परंतु या वेळापत्रकातील तारखा विद्यापीठांच्या परीक्षांसोबत येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे केली होती.
सुधारित वेळापत्रक
10 ऑक्टोबर : बीएचएमसीटी सीईटी
11 ऑक्टोबर : एमएएच-एलएल.बी. (5 वर्षे) सीईटी
18 ऑक्टोबर : बी.ए., बी.एस्सी. बी.एड. (इंटिग्रेटेड) सीईटी
21 ते 23 ऑक्टोबर : बी.एड.. (ईएलसीटी) सीईटी
27 ऑक्टोबर : बी.एड., एम.एड. इंटिग्रेटेड सीईटी,
28 ऑक्टोबर : एमसीए सीईटी
29 ऑक्टोबर : एम.पीएड. सीईटी
31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर : एम.पीएड. फील्ड टेस्ट
2 व 3 नोव्हेंबर : एलएल.बी. (3 वर्षे) सीईटी
4 नोव्हेंबर : बी.पी.एड. सीईटी
5 ते 8 नोव्हेंबर : बी.पी.एड. फील्ड टेस्ट
5 नोव्हेंबर : एम.एड. सीईटी